‘शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी ठेकेदारांसोबत भ्रष्टाचार करून मुंबईला खड्ड्यात घातले आहे. ठेकेदारांशी संगनमत करून नगरसेवकांनी रस्त्यांच्या कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्याचा त्रास सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. याचाच जाब विचारण्यासाठी युवा काँग्रेसने आज महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांना हाताशी घेऊन महापालिका प्रशासनाने आंदोलकांवर लाठीचार्ज केला.’ असे मुंबई युवा काँग्रेसचे अध्यक्ष गणेश कुमार कांबळे असे सांगितले.
तर ‘महापालिका मुख्यालयाबाहेर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनाही आंदोलकांनी धक्काबुक्की केली. तरीही शांततेचे आवाहन करणाऱ्या पोलिसांवर काही आंदोलकांनी हातात असलेल्या झेंड्याच्या काठ्या भिरकावल्या. परिणामी, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला.’ असे पोलिसांनी सांगितले आहे.
