महापौरपदी डॉ. भारती बावधने की स्नेहल आंबेकर? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापौरपदी डॉ. भारती बावधने की स्नेहल आंबेकर?

Share This
मुंबई महापालिकेच्या शनिवारी जाहीर झालेल्या आरक्षणात महापौरपद अनुसुचित जातीसाठी (एससी) आरक्षित मतदारसंघातून निवडून आलेल्या महिलेसाठी राखीव झाल्याने शिवसेनेतील दोन नगरसेविकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विद्यमान महापौरांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पूर्ण होत असल्याने या पदाची माळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणाच्या गळ्यात टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने वॉर्ड क्र. ११७ मधील (विक्रोळी) डॉ. भारती बावधने आण‌ि वॉर्ड १९४ मधील (लोअर परळ) स्नेहल आंबेकर या दोन नगरसेविका या पदासाठी दावेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेतील यामिनी जाधव याही एससी प्रवर्गातील आहेत; परंतु, त्या खुल्या वॉर्डातून निवडून आल्याने त्यांचा पत्ता कापला गेला आहे.

लोअर परळ भागातून यापूर्वी दत्ताजी नलावडे, नंदू साटम, महादेव देवळे या नगरसेवकांना महापौरपद भू‌षविण्याची संधी मिळाली असून, विक्रोळी भागातील फक्त दत्ता दळवी यांनाच या पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शि‍वसेनेत दोन उमेदवारांमध्ये चुरस रंगली असताना भाजपनेही या स्पर्धेत उडी घेतली आहे. भाजपने यापूर्वी अनेकवेळा स्थायी समितीचे अध्यक्षपद किंवा महापौर पदाची मागणी शिवसेनेकडे केली आहे; मात्र, सेनेने सुधार समितीचे अध्यक्षपद आण‌ि उपमहापौरपद देऊन भाजपची बोळवण केली आहे. भाजपमध्ये कांदिवली येथून निवडून आलेल्या शैलजा गिरकर आण‌ि मुलुंडच्या समिता कांबळे या दोन अनुसुचित जातीतील उमेदवार आहेत. शिवसेनेने युतीधर्माचे पालन करून पुढची अडीच वर्षे महापौरपद भाजपला द्यावे, अशी मागणी जोर धरू लागल्याचे कळते.

डॉ. भारती बावदाने  ( बौद्ध )    स्नेहल अंबेकर (१९४) चर्मकार 
          

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages