दहीहंडी पोलिसांच्या रडारवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2014

दहीहंडी पोलिसांच्या रडारवर

दहीहंडीच्या थरावर बारा वर्षांखालील मुलांना चढवण्यास घातलेली बंदी... कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे लागलेली डेसिबलची फुटपट्टी... मंडळांचा सरकारशी झालेला वाद या पार्श्वभूमीवर हायकोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली दहीहंडी पोलिसांच्या रडारवर आली आहे. मोठ्या रकमांच्या हव्यासापोटी हंडीच्या वरच्या थरांवर लहान मुलांचा वापर झाल्यास पोलिस आणि मंडळांमध्ये संघर्ष अटळ असून, मुंबई-ठाण्यातील मंडळे आणि आयोजकांवर पोलिसांचा वॉच असून, खास पथक तयार करण्यात आले आहे.

दहीहंडीत थरावर चढवण्यासाठी होत असलेल्या लहान मुलांच्या वापरावरून यंदा हंडीच्या काही दिवस आधीच वादाचे गालबोट लागले. आयोजक आणि मंडळांनी हेकेखोर भूमिका कायम ठेवल्याने अखेर हा वाद राज्य बालहक्क आयोग आणि कोर्टापर्यंत गेला. त्यामुळे हंडीसाठी नियमावली तयार करण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले. मात्र, नियमावली करण्यास वेळ कमी असल्याने १२ वर्षांखालील मुलांना थरावर चढवू नये, असा तोडगा काढण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS