मुंबई मधील जी उत्तर, एफ दक्षिण, एफ उत्तर या तीन विभागातील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींमधील किती इमारतींचा विकास करण्यात आला याची माहिती मागवूनही न माहिती योग्य रित्या न दिल्याने एका महिन्याच्या आत अर्जदार दिलीप गायकवाड यांना माहिती देण्यात यावी असे आदेश बृहन्मुंबई माहिती आयुक्त अजितकुमार जैन यांनी दिले आहेत.
जी उत्तर, एफ दक्षिण, एफ उत्तर या तीन विभागातील किती उपकारप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्यात आला, किती इमारतींना पुनर्वसन करण्याची परवानगी म्हाडा कार्यालयाने दिली, त्या इमारतीचे नाव आणि पत्ते व सविस्तर माहिती गायकवाड यांनी १२ ऑक्टोबर २०१२ला माहिती अधिकारातून मागितली होती. परंतू म्हाडामधील मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरचना मंडळाच्या अधिकार्यांनी महिती देण्यास नकार दिला होता. या विरोधात गायकवाड यांनी माहिती अधिकारा नुसार अपील दाखल केले होते.
संदर प्रकरणात अपील अधिकार्यांनी आदेश देवूनही माहिती देताना पुनरचना प्रक्रियेमध्ये म्हाडाला किती सदनिका प्राप्त झाल्या याचा तपशील देण्यात आलेला नव्हता. यामुळे अपिलकर्ते दिलीप गायकवाड यांचे समाधान न झाल्याने त्यांनी माहिती आयोगाकडे अपील दाखल केले असता सविस्तर माहिती एक महिन्यात द्यावी तसेच याबाबत केलेल्या लेख अनुपालन अहवाल १५ सप्टेंबर पर्यंत माहिती आयोगाला सदर करावा असे आदेश बृहन्मुंबई माहिती आयुक्त अजितकुमार जैन यांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरचना मंडळाला दिले आहेत.

No comments:
Post a Comment