भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील सिद्धार्थ वसतिगृह धोकादायक ठरवून पाडण्याचे षडयंत्र रचले जात असतानाच वसतिगृहाला पालिकेने दिलेल्या नोटीसीबाबत न्यायालयात दावा प्रलंबित असल्याचे माहिती अधिकारातून कळवले आहे. यामुळे पालिकेला वसतिगृह पडण्याची घाई का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सिद्धार्थ वसतिगृहाला पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाच्या कार्यकारी अभियंता शहर २, सहाय्यक अभियंता शहर तसेच एफ उत्तर विभागाच्या अधिकार्यांनी २० मे २००५ रोजी भेट देवून हि इमारत धोकादायक ठरवून हि इमारत खाली करून पाडण्यासाठी ३५४ ची नोटीस बजावली होती. वसतिगृहाची इमारत खाली केली जात नसल्याने पालिकेने सोसायटीच्या ट्रस्टी विरोधात फ़ॉउजदरि दावा दाखल केला होता. या दाव्याबाबत सुनवाई झाल्यावर पालिकेला चपराक देत न्यायालयाने २९ एप्रिलला ट्रस्टीना निर्दोष मुक्त केले होते.
पालिकेने पुन्हा त्याच दरम्यान २३ एप्रिलला वसतिगृह खाली करण्यासाठी ३५४ ची नोटीस बजावली आहे. नुकताच १२ ऑगस्टला बेस्ट प्रशासनाने वसतिगृहाचा विजेचा मीटर काढून नेला आहे. आधीच पाण्याची अडचण असताना विजेचा मीटर काढल्याने आता विर्थ्याना पाण्याशिवाय दैवास काढावे लागत आहेत. अशी सर्व परिस्थिती असताना पालिकेच्या एफ उत्तर विभाग कार्यालयातील इमारत व कारखाने विभागाच्या सहाय्यक अभियंता एस. जी. मालेकर यांनी या बाबत दादर शिंदेवाडी कोर्ट क्रमांक ४१ येथे प्रकरण प्रलंबित असल्याचे माहिती अधिकारात दिलीप गायकवाड यांना कळविले आहे.
एकीकडे वसतिगृह खाली करण्याचे षडयंत्र रचले जात असताना पालिकेने माहिती अधिकारात याबाबत प्रकरण प्रलंबित असल्याचे कळवल्याने विद्यार्थी आणि आंबेडकरी जनतेत संतापाची लाट पसरली असून वसतिगृह खाली करून पडायची पालिकेला घाई का ? वसतीगृह पाडून पालिका कोणाला फायदा करून देण्याचा प्रयत्न करत आहे ? असे प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केले आहेत.


No comments:
Post a Comment