मुंबई - अंधेरीतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात "कट प्रॅक्टिस‘ सुरू असल्याची तक्रार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने पालिकेकडे केली होती. त्यामुळे या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणीही कौन्सिलने केली होती; मात्र अशी कारवाई करण्याचा अधिकार नाही, असे पत्र महानगर पालिकेने कौन्सिलला पाठवले आहे.
मुंबईतील अनेक रुग्णालयांत "कट प्रॅक्टिस‘ सुरू असते; मात्र त्याचे पुरावे मिळत नाहीत, अशी कबुली महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अंधेरीतील कोकिळाबेन रुग्णालयाबाबत अशी तक्रार पहिल्यांदाच आली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. रुग्णालयांना परवाना देण्याचा अधिकार महानगर पालिकेला असला, तरी रुग्णालयांत सुरू असलेल्या नियमबाह्य प्रकारांवर कारवाईचा अधिकार मात्र नाही. अशा प्रकरणी कारवाई करता येईल, असा कोणताही नियम अस्तित्वात नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

कोकिळाबेन रुग्णालयातील कथित "कट प्रॅक्टिस‘संदर्भात कारवाई करण्याचा अधिकार महानगर पालिकेला नाही. त्याबाबतचे पत्र महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पाठवले आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली. महानगर पालिकेने नेमके काय करावे, अशी विचारणाही या पत्रात केल्याचे त्यांनी सांगितले. अशा तक्रारींबाबत रुग्णालयांवरील कारवाईचा निर्णय इंडियन मेडिकल कौन्सिलने घेतला पाहिजे, अशी महानगर पालिकेची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.