कारवाही करण्यास पालिकेची टाळाटाळ
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या भांडूप येथील एस वार्डच्या हद्दीमध्ये फक्त ८ दुकाने अधिकृत असून बाकी सर्व दुकाने पालिका अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अनधिकृतपणे चालवली जात आहेत.
मुंबई महानगर पालिकेच्या एस वार्डच्या हद्दीमध्ये किती मटणाची दुकाने अधिकृत आहेत आणि किती अनधिकृत आहेत याची आकडेवारी माहिती अधिकार कार्यकते आनंद पारगावकर यांनी मागवली होती. याबाबत माहिती देताना भांडूप ते विक्रोळी आणि पवई पर्यंत पसरलेल्या एस वार्ड मध्ये फक्त ८ मटणाची दुकाने अधिकृत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक दुकाने व आस्थापना यांनी माहिती अधिकारात कळविले आहे.
एस वार्डच्या हद्दीमध्ये फक्त आठच दुकाने अधिकृत असल्याने इतर जवळपास २०० दुकाने बेकायदेशीर पणे चालू आहेत. या बेकायदेशीर दुकानांवर कारवाही करून हि बेकायदेशीर दुकाने बंद करावीत अशी मागणी पारगावकर यांनी सहाय्यक आयुक्त एस वार्ड यांच्याकडे ऑक्टोबर २०१२ मध्ये तर नोव्हेंबर २०१२ मध्ये उप अधीक्षक बाजार घाटकोपर यांच्याकडे केली होती. तेव्हा पासून सतत स्प्मरणपत्र पाठवून कारवाही करण्याची मागणी करूनही अद्याप कोणतीही कारवाही करण्यात आलेली नाही.
सह्हाय्क आयुक्त एस वार्ड व उप अधीक्षक बाजार यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाही होत नसल्याने पारगावकर यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र देवून बेकायदेशीर पाने चालणारी मटणाची दुकाने बंद करावीत तसेच या बेकायदेशीर दुकानांना संरक्षण देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाही करावी अशी मागणी पारगावकर यांनी केली आहे.
