मुंबई महानगर पालिकेत कुत्र्यांच्या नसबंदीत भ्रष्टाचार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महानगर पालिकेत कुत्र्यांच्या नसबंदीत भ्रष्टाचार

Share This
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास टाळाटाळ
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. कुत्र्यांची नसबंदी केलेली संख्या माहिती अधिकारात एक आणि अपील सुनावणीत वेगवेगळी दाखवण्यात आली आहे. पालिकेकडून वेगवेगळी आकडेवारी दिली गेल्याने कुत्र्यांच्या नसबंदी मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत डिसेंबर २०१२ पासून सतत चौकशी करण्याची मागणी करूनही पालिकेच्या आरोग्य विभागाने आणि पालिका आयुक्तांनी कोणतीही कारवाही केली नसल्याने पालिका आयुक्त आरोग्य विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी केला आहे. 

मुंबई मध्ये भटक्या कुत्र्यांनी मुंबईकर नागरिकांना चावा घेण्याचे प्रकार वाढत असल्याने तसेच मुंबई मध्ये सतत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने किती कुत्र्यांची नसबंदी केली, त्यासाठी किती खर्च केला, नसबंदी करण्यासाठी कोणत्या संस्थांची नेमणूक करण्यात आली, त्यांना किती निधी दिला, या संस्थांवर किती खर्च झाला याची सविस्तर माहिती आनंद पारगावकर यांनी सप्टेंबर २०१२ मध्ये पालिकेकडून मागवली होती. याबाबत माहिती देताना सन १९९४ ते २०१२ पर्यंत २ लाख ४३ हजार २६६ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. त्यासाठी सन २००७-८ मध्ये १,१४,५८,०४२रुपये, सन २००८-९ मध्ये २,६६,९४,१४४ रुपये, सन २००९-१० मध्ये २,५४,५५,८७३ रुपये, सन २०१०-११ मध्ये १,७२,६१,४४७ रुपये, सन २०११-१२ मध्ये ९७,३३,०५० रुपये तर सन २०१२ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत १४,६२,५०० रुपये खर्च केले आहेत असे उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शांताराम नाईक यांनी कळविले होते. 

पालिकेच्या आरोग्य विभागाने पुरविलेली माहिती समाधान कारक नसल्याने पारगावकर यांनी प्रथम अपील दाखल केले होते. सप्टेंबर २०१२ मध्ये सन १९९४ ते २०१२ पर्यंत २ लाख ४३ हजार २६६ कुत्र्यांची नसबंदी केली अशी माहिती देणाऱ्या आरोग्य विभागाने या अपिलाच्या सुनावणी वेळी ऑक्टोंबर २०१४ मध्ये ११९४ ते २०१२ ऑक्टोंबर पर्यंत २ लाख ४४ हजार ११६ कुत्र्यांची नसबंदी केल्याचे म्हटले होते. माहिती अधिकारात आणि अपिलावरील सुनवाई दरम्यान ८५० कुत्रांची अधिक नसबंदी केल्याचे दाखवण्यात आले. एक महिन्यात आकडेवारी मध्ये मोठ्या प्रमाणात बदल दाखवण्यात आले आहेत. 

कुत्र्यांच्या नसबंदी मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने आनंद पारगावकर यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी करण्याचे पत्र डिसेंबर २०१२ मध्ये पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बामणे तसेच पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे दिले होते. पारगावकर गेले दीड वर्षे याबाबत सातत्याने पाठपुरावा करत करत आहेत. परंतू पालिकेने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही कि चौकशी केलेली नाही. यामुळे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बामणे आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप पारगावकर यांनी केला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages