रहिवाशांना कचऱ्याच्या दुर्गंधीतून लवकरच मुक्ती मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रहिवाशांना कचऱ्याच्या दुर्गंधीतून लवकरच मुक्ती मिळणार

Share This

मुंबई - देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या पाच किलोमीटर परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. हॉटेलांनी फेकलेले खराब अन्न आणि देवनार कत्तलखान्यातील प्राण्यांचे निरुपयोगी अवयव यांमुळेच दुर्गंधित वाढ झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका आणि भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्या पुढाकाराने कचरा विघटन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 

देवनार कत्तलखान्यात प्राण्यांची आतडी, फुप्फुसे आणि रक्ताची विल्हेवाट न लावल्यामुळे दुर्गंधी वाढते. म्हणूनच देवनारचा जैवकचरा प्रकल्प बंद करून 20 टन क्षमतेचा प्रकल्प महापालिका उभारणार आहे. अशा प्रकारची संयंत्रे बारामती आणि नाशिक येथे आहेत; मात्र तिथे शेणावर प्रक्रिया केली जाते. नवीन प्रकल्पात कचरा वाहून नेण्यासाठी "कन्व्हेअर बेल्ट‘, अद्ययावत यंत्रसामग्री असेल, असे भाभा अणुसंशोधन केंद्रातील "न्यूक्‍लिअर ऍग्रिकल्चर अँड "बायोटेक्‍नॉलॉजी‘ विभागाचे प्रमुख प्रा. एस. पी. काळे यांनी सांगितले. या ठिकाणी 20 टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याची महापालिकेची तयारी असली, तरी दीड टन ते पाच टन इतकी क्षमता पुरेशी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
केवळ कचरा वाहून नेण्यासाठी महापालिका दर वर्षाला 14 कोटी रुपये खर्च करते. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे काम घरापासूनच सुरू झाल्यास या खर्चात मोठी घट होऊ शकेल. त्यासाठीच जर्मनी आणि जपान या देशांचे उदाहरण समोर ठेवायला हवे. जर्मनीत 31 प्रकारांत आणि जपानमध्ये तर 51 प्रकारांत कचरा वेगळा केला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages