दि : १९ ऑगस्ट / मानखुर्द /रशिद इनामदार
मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही मानखुर्द येथील रुग्णांचा जीव टांगणीला लागल्याचे दिसत आहे. वीरमाता जिजाबाई भोसले मार्गालगत असलेल्या , मंगलमुर्ती संकुलातील अनधिकृत रुग्णालयामुळे हे प्रकरण उजेडात आले आहे .
गजानन रुग्णालय अनधिकृत आहे. या रुग्णालयामध्ये शासनाने बंदी घातलेल्या औषधांचा वापर केला जातो. रुग्णांना उपचार घेत असताना आवश्यक सोई सुविधा मिळायला हव्यात त्या मिळत नाहीत. म्हणून या रुग्णालयाची चौकशी व्हावी अशा आशयाचा अर्ज एका तक्रारदाराने मुंबई महापालिका आरोग्य अधिकारी एम पूर्व विभाग संदीप गायकवाड यांच्याकडे केला होता. त्या अर्जानुसार योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाइल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये हे रुग्णालय मुंबई महापालिकेमध्ये नोंदनी झालेले नसून अनधिकृतपणे सुरु असल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिकार्यांनी रुग्णालय त्वरित बंद करावे असे आदेश दिले होते . तरीही रुग्णालय सुरूच राहिले. वैद्यकीय विभागाशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर कळाले वैद्यकीय विभागाने संबंधित रुग्णालयाविरोधात न्यायालयाकडे प्रकरण पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे .दोनदा बंदीचे आदेश देऊनही रुग्णालय बिनबोभाट सुरूच आहे . असे तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरून कळते.
काही दिवसापूर्वी या रुग्णालयात उपचार घेत असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला होता . तेंव्हा त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. ते प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ठ आहे .मुळात अनधिकृत रित्या सुरु असलेल्या या रुग्णालय त्याच वेळी कारवाई करून बंद करायला हवे होते. अजूनही ते सुरु कसे असा प्रश्न स्थानिकांना पडताना दिसत आहे . या अनागोंदी कारभाराबद्दल स्थानिक रुग्णांना माहिती नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गरजेपोटी त्यांचा जीव टांगणीला लागत आहे .
डॉ . संदीप गायकवाड , वैद्यकीय अधिकारी मुंबई महानगरपालिका , एम पूर्व विभाग
आम्ही या तक्रारीची पूर्ण चौकशी करून त्यांना सूचना दिली आहे . आम्ही आमच्या कायदे प्रमुखांकडे याबद्दल माहिती पोहोच्वलेली आहे. ते हे प्रकरण न्यायालयात मांडतील त्यावर नायालय निर्णय देईल. हे रुग्णालय मुंबई मनपा कडे नोंदणीकृत नाही .
विशाल लोंढे ,उपनिरीक्षक मानखुर्द पोलिस ठाणे
माझ्याकडे फसवणुकीच्या तक्रारीचा अर्ज आला होता . मी त्यांना हा भागीदारीतील वाद आहे . त्यामुळे याचा न्याय निवडा करण्यासाठी योग्य त्या आवश्यक बाबींची पूर्तता करून न्यायालयाकडे दाद मागा असा सल्ला दिला .

No comments:
Post a Comment