वाहतूक कोंडीमुळे बेस्टच्या कॅनेडियन वेळापत्रकाचा फज्जा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2014

वाहतूक कोंडीमुळे बेस्टच्या कॅनेडियन वेळापत्रकाचा फज्जा

मुंबई - बेस्ट उपक्रमाला नफ्यात आणण्याच्या हेतूने कर्मचाऱ्यांसाठी नवे कॅनेडियन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे; परंतु वाहतूक कोंडीमुळे हे वेळापत्रक कोलमडले आहे. कामगारांचे कामाचे तास वाया जात असून, कित्येक किलोमीटरचे नुकसान होत आहे. त्यामुळे बेस्टला मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे समजते. 


बेस्टमध्ये कॅनेडियन वेळापत्रक अमलात येऊन चार महिने उलटले; मात्र कोणतीही सुधारणा न होता उलट उत्पन्नात घट झाली आहे, असे कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुहास नलावडे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. नियोजित वेळापत्रकापेक्षा बसगाड्यांच्या कमी फेऱ्या होत असल्याने चालक आणि वाहकांचे कामाचे तास वाया जात आहेत. परिणामी बेस्टचे आर्थिक नुकसान होत आहे, असे ते म्हणतात. उत्पन्नात वाढ होईल, या उद्देशाने बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी कॅनेडियन वेळापत्रक आणले. बेस्ट समिती आणि सत्ताधारी संघटनेला हाताशी धरून हे वेळापत्रक कामगारांवर लादण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला आहे.
मुंबईत ठिकठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बेस्ट बसगाड्यांचा वेग मंदावला आहे. वाहतूक कोंडी फोडून बसगाड्यांचे वेळापत्रक मार्गावर आणण्याचा प्रयत्न वाहतूक अधिकारी करीत नाहीत, असा ठपकाही त्यांनी ठेवला. याबाबत वाहतूक आयुक्तांशी पत्रव्यवहार केला; मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad