चौपाट्यांवर दहा हजार पालिका कर्मचारी, चारशे जीवरक्षक तैनात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2014

चौपाट्यांवर दहा हजार पालिका कर्मचारी, चारशे जीवरक्षक तैनात

 गणेश विसर्जन होणार्‍या सर्व चौपाट्यांवर सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा  वॉच ठेवण्यात येणार आहे. तसेच उत्सवाच्या अकराही दिवसांत चौपाटी आणि विसर्जन  स्थळांवर महापालिकेचे दहा हजार कर्मचारी, चारशे जीवरक्षक तैनात ठेवण्यात येणार  आहेत. 


महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी पत्रकार परिषद घेऊन गणेशोत्सवाच्या तयारीची संपूर्ण माहिती दिली. चौपाट्यांवर २५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक विसर्जनस्थळी ८ ते १० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असे श्रीनिवास म्हणाले. सर्व सोयीसुविधांवर महापालिका १३ ते १५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

- गणेश मंडप उभारण्यासाठी महापालिकेने ४५० गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे, तर ४२ गणेश मंडळांची परवानगी रोखण्यात आली आहे. या मंडळांनी खड्डे केले होते. त्याबदल्यात त्यांना महापालिकेने दंड आकारला होता. त्याची रक्कम न भरल्याने त्यांची परवानगी रोखण्यात आल्याचे श्रीनिवास म्हणाले. 

मुंबई पोलीस सज्ज
गणेशोत्सव निर्वघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविक, नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनीदेखील ऍलर्ट राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस पाच स्तरांवर सुरक्षा ठेवणार आहेत. १) गुन्हेविरोधी २) दहशतवादविरोधी ३) गर्दी नियंत्रण व देखरेख ४) आपत्कालीन व्यवस्था ५) धार्मिक सुरक्षा अबाधित ठेवणे अशा पाच स्तरांवर मुंबई सुरक्षा राहणार आहे. साध्या वेशातील पोलीस, छेडछाडविरोधी पथके, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंसेवक अशा माध्यमातून खडा पहारा ठेवण्यात येणार असल्याचे सहपोलीस आयुक्त धनंजय कमलाकर यांनी सांगितले. 

दरम्यान, २, ४, ७ आणि ८ सप्टेंबर या चार दिवशी सकाळी ६ ते मध्यरात्री १२ पर्यंत लाऊडस्पीकर वाजविण्यास पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ४५ हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी शहरात सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. 

हरवणार्‍या मुलांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी जुहू, गिरगाव, वांद्रे, पवई व शिवाजी पार्क चौपाट्यांवर कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे. आपल्या परिसरात अज्ञात इसमांना गाड्या शक्यतो पार्क करू देऊ नका तसेच पार्क केलेल्या वाहनांवर लक्ष ठेवा, असे आवाहन सहपोलीस आयुक्त बी. के. उपाध्याय यांनी केले आहे.

Post Bottom Ad