कोळसे पाटील यांची आता चौथी आघाडी ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोळसे पाटील यांची आता चौथी आघाडी !

Share This
मुंबई : आघाडी आणि महायुतीमध्ये नसलेल्या आणि सद्सद्विवेकबुद्धीने स्वच्छ राजकारण करू इच्छिणार्‍या छोट्या राजकीय पक्षांना हाताशी घेऊन राज्यात चौथी आघाडी उभी करत असल्याचे नवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी येथे सांगितले. 

लोकशासन आंदोलन पक्ष, देश बचाव पार्टी आणि अखिल भारतीय सम्राट सेना या पक्षांनी चौथ्या आघाडीत प्रवेश केला आहे. आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आणि शिवराज पक्ष यांच्या सोबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून ते चौथ्या आघाडीत सहभागी होणार आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या पाच मुद्दय़ांवर चौथी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असे कोळसे पाटील यांनी सांगितले. 

काँग्रेसने काही जागांचे आमिष दाखविल्यानंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्याला बळी पडतात आणि तिसरी आघाडी विसर्जित करतात, असा आरोप सम्राट सेनेचे अध्यक्ष भीमराव कडाळे यांनी केला. धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचे देश बचाव पार्टीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages