इबोला रोखण्यासाठी उपाययोजना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

इबोला रोखण्यासाठी उपाययोजना

Share This
मुंबई - इबोला रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, मुंबई विमानतळावर आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या दोन रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्‍यता विचारात घेऊन ही सेवा देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत मंगळवारी देण्यात आली. 

मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येक रुग्णालयात दहा खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या आपत्तीशी सामना करण्याची तयारी ठेवावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. आरोग्य सेवेच्या आंतरराष्ट्रीय शाखेचे महासंचालक; तसेच केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने विमानतळावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. इबोला रोग झाल्याचा संशय असलेले प्रवासी आढळल्यास त्यांची माहिती जमविण्यात येणार असून, त्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक संबंधित राज्य सरकारकडे तत्काळ पाठवण्यात येणार आहेत. इबोला रोगाच्या चाचणीची सुविधा देण्याचे आदेश पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला राज्य सरकारने दिले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages