मुंबई - मुंबईकर तापाने त्रस्त झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसते. आतापर्यंत 9273 व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारच्या तापाची लागण झाली आहे. पावसाने आता काहीशी उसंत घेतली असली, तरी तापाची साथ सुरूच आहे. तापाचे प्रमाण मागील वर्षीपेक्षा अधिक असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तापाचे 1733 रुग्ण आढळले. गॅस्ट्रोचे 292, मलेरियाचे 235, हेपॅटायटिसचे 39 आणि टायफॉईडचे 35 रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात डेंगीचे 18 रुग्ण आढळले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
Post Top Ad
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

