मुंबई / अजेयकुमार जाधव
दहीहंडी सन दरम्यान होणारे मृत्यू आणि जखमी होणार्यांची सख्या यामुळे हंड्या फोडण्यासाठी १२ वर्षांखालील मुलांना थरांवर चढवू नये असे आदेश राज्य बाल हक्क आयोगाने दिले होते. यामुळे लहान मुलांचा हंड्या फोडण्यासाठी वापर न करण्याचा तोडगा काढण्यात आला. तरीही मुंबई मध्ये कित्तेक ठिकाणी १२ वर्षा खालील मुलांना थरांवर चढवून हंड्या फोडण्यात आल्याने दहीहंडी फोडणारे आणि आयोजक यांनी कायदा धाब्यावर बसवला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
दहीहंडी फोडताना सन २०१० मध्ये २ जणांचा मृत्यु झाला असून २७० जण जखमी झाले होते. सन २०१२ मध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून २५१ जण माखामी झाले होते. सन २०१३ मध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून ३६५ जण जखमी झाले आहेत. तर या वर्षी दहीहंडी फोडण्यापूर्वी केल्या जाणार्या सरावावेळी नवी मुंबई येथे किरण तळेकर (१२) व जोगेश्वरी येथे ऋषिकेश पाटील (१९) या दोघांचा मृत्यू झाला आहे. दहीहंडी दरम्यान लहान मुलांचा वापर केला जात असल्याने राज्य बालहक्क आयोगाने लहान मुलांना दहीहंडी मध्ये वरच्या थरावर चढवायला बंदी घातली आहे.
यामुळे आयोजक आणि हंडी फोडणाऱ्या मंडळाकडून लहान मुलांचे जन्मदाखला बघितला जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतू बहुतेक ठिकाणी कोणत्याही दाखल्यांची शहानिशा न करताच दहीहंडी फोडण्यासाठी लहान मुलांना वरच्या थरावर चढवले जात होते. पोलिसांकडून यासाठी खास पथक तयार करण्यात आले असे सांगण्यात येत असले तरी पोलिसांसमोर खुले आम लहान मुले दहीहंडी फोडताना दिसत होती. तर मोटार सायकल वरून तीन चार जन बसून प्रवास करणे, ट्रक, टेम्पोच्या टपावरून प्रवास करणे गुन्हा असला तरी पोलिसांनी दहीहंडीच्या दिवशी आपले डोळे झाकून घेतल्याने कायद्याला खुले आव्हान देत असले तरी पोलिसांनी अश्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलेले दिसले.

No comments:
Post a Comment