शाहरूखविरुद्ध रस्ता अडवल्याची तक्रार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2014

शाहरूखविरुद्ध रस्ता अडवल्याची तक्रार

मुंबई - वांद्रे पश्‍चिम येथे अभिनेता शाहरूख खान याने आपल्या "मन्नत‘ बंगल्याच्या बाजूला बेकायदा रॅम्प बांधून जुना रस्ता बंद केला आहे, अशी तक्रार स्थानिकांनी केली होती. बुधवारी महापालिकेच्या पथकाने याबाबत पाहणी केली. इमारत प्रस्ताव विभागाकडून याविषयी अहवाल मागवण्यात येणार आहे. त्यात रॅम्प बेकायदा असल्याचे नमूद केल्यास प्रशासन कारवाई करणार आहे. 

"मन्नत‘ बंगल्याच्या बाजूला रॅम्प बांधल्याने हा रस्ता बंद झाला आहे. माऊंट मेरीच्या जत्रेला येणाऱ्या भाविकांना वळसा घालून जावे लागते. वॉच डॉग फाऊंडेशनने केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेने गेल्या वर्षी जत्रेच्या वेळी हा रस्ता नागरिकांसाठी खुला केला होता; मात्र जत्रा संपल्यानंतर पुन्हा हा रस्ता रॅम्प बांधून बंद करण्यात आला. हा बेकायदा रॅम्प तत्काळ हटवण्याची मागणी फाऊंडेशनने महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली होती. त्यानंतर बुधवारी एच-पश्‍चिम विभाग कार्यालयातील अभियंत्यांनी पाहणी केली. त्यांचा अहवाल लवकरच सादर होईल. हा रॅम्प बेकायदा असल्याचे दिसल्यास कारवाई करण्यात येईल, असे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले. "मन्नत‘ बंगल्याला अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकानुसार रस्त्याच्या काही भागाचा ताबा देण्यात आला आहे, असा दावा केला जात होता. त्यासाठी महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून अहवाल मागवण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS