शहरातील चौक होणार चकाचक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2014

शहरातील चौक होणार चकाचक

मुंबई - सायन सर्कल, किंग्ज सर्कल, खोदादाद सर्कल, कस्तुरबा चौक, होरनिमन सर्कल, हाजीअली असे शहरातील तब्बल ५५ चौक लवकरच चकाचक होणार आहेत. त्याचबरोबर पूर्व उपनगरातील छोट्या मोठ्या ८३ रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या सुविधेसाठी गुळगुळीत रस्त्यांसाठी ६०० कोटींच्या कामांना आज स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली. 


शहरात सध्या अस्तित्वात असलेले भलेमोठे चौक हे पेवर ब्लॉक किंवा डांबरांमध्ये असून कालांतराने झीज झाल्यामुळे, भेगा पडल्यामुळे, वाहनांच्या वर्दळीमुळे अनेक चौक खराब स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांचे टप्प्याटप्प्याने मॅकेनाईज्ड मास्टिक, डांबरीकरणाद्वारे मजबुतीकरण व सुधारणा करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. शहरातील चौकांच्या कामांसाठी ४०० कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

पूर्व उपनगरातील ८३ रस्ते मजबूत होणार- चौकांच्या कामांबरोबरच पूर्व उपनगरातील मुख्य व लहान रस्त्यांच्या मजबुतीकरणाचाही प्रस्तावही आजच्या स्थायी समितीमध्ये मंजूर झाला. मोठ्या प्रमाणात वाढलेली वाहतुकीची वर्दळ, उपयोगिता संस्थांनी खणलेले खड्डे, पाणी साचून राहणे, जलवाहिन्यांद्वारे होणारी गळती आदी विविध कारणांमुळे पूर्व उपनगरातील रस्ते खराब अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांचे टप्प्याटप्प्याने मजबुतीकरण करण्यासाठी पालिकेने दोन वर्षांचा ‘मास्टर प्लान’ बनवला आहे. त्यानुसार ८३ रस्त्यांची लवचीक फरसबंदीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच लवकरच पश्‍चिम उपनगरासाठी लवकरच रस्ते मजबुतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीनिवासन यांनी दिली.

प्रकल्प तत्त्वांचा अवलंब
- पर्जन्य जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या सुधारण्याचाही समावेश करण्यात आला आहे. चौकाच्या प्रत्येक बाजूस युटीलिटी वायर्ससाठी इंक्टिंग पाइप टाकण्याचीही तरतूद केली आहे.

अशी आहेत कामे
- शहरातील चौकांचे मॅकेनीज मास्टिकद्वारे रिर्स्फेसिंग - ४०० कोटी
- एम पश्‍चिम (चेंबूर) छोटे व मोठे रस्ते मजबुतीकरण - १५३ कोटी
- एम पश्‍चिम - कॉंक्रिटचे रस्ते - ३२ कोटी
- कुर्ला, भांडुप मुलुंडमधील रस्त्यांसाठी - ३५ कोटी

Post Bottom Ad

JPN NEWS