मुंबई / अजेयकुमार जाधव
घाटकोपर पश्चिमेस एल. बी. एस. मार्गावरील सर्वोदय एस.टी. थांब्याजवळ असलेले पोळी भाजी केंद्र या मागे उभ्या राहत असलेल्या एकमे बिल्डरच्या टॉवर साठी पालिकेच्या मदतीने तोडला जात आहे. अशी तक्रार भीमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठानने मुंबईच्या महापौर, पालिका आयुक्त, व पोलिस आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून बिल्डर आणि पालिका अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास कमी करावा अशी मागणी केली आहे.
सर्वोदय जवळ एस.टी. थांबा असून हा थांबा व पाणपोई होती. याचा वापर कपडे वाळत घालण्यासाठी व कचरा टाकण्यासाठी केला अजात होता. काही लोक या जागेचा वापर भंगार ठेवण्यासाठी करत होते. तत्कालीन स्थानिक आमदार आणि नगरसेवक यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी पाणपोई सुरु करण्यात आली. परीतेक्ता व विधवा स्त्रियांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून पाणपोई बरोबर पोळी भाजी केंद्र चालवण्यात येत आहे. गेले ११ वर्षे पालिकेने आणि स्थानिक नगरसेवकांनी पोळीभाजी केंद्राला कोणताही विरोध केला नाही.
परंतू काही महिन्यांपासून या पोळी भाजी केंद्राच्या मागील बाजूस एकमे बिल्डरकडून टॉवर उभारले जात आहेत. या टॉवर कडे जाण्यासाठी रस्ता हवा असल्याने आमच्या बाजूची सर्व दुकाने नियमित करून फक्त आमचे पोपोली भाजी केंद्र तोडण्याचा घाट घातला जात आहे. यासाठी वेळोवेळी आमचे सामान पालिकेकडून उचलले जात असून कोणताही दंड न आकारता त्याची पावती न देत कोणतीही कारवाही न करता माल पुन्हा दिला जात आहे. हे फक्त बिल्डरला खुश करण्यासाठी केले जात असून आमचा त्रास कमी करावा अशी मागणी भीमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठानचे किसान गोपळे यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:
Post a Comment