गरीब व गरजू महिलांच्या मशिनी अध्यक्षांनी विकून खाल्ल्या - धनंजय पिसाळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 August 2014

गरीब व गरजू महिलांच्या मशिनी अध्यक्षांनी विकून खाल्ल्या - धनंजय पिसाळ

मुंबई महानगर पालिकेच्या महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षांनी गरीब व गरजू महिलांना रोजगार निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या मशिनी विकून खाल्ल्या असल्याचा आरोप पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी केला आहे. 

पालिकेच्या महिला व बालविकास समिती कडून जेंडर बजेट अंतर्गत विधवा, गरीब व गरजू महिलाना रोजगार मिळावा म्हणून शिलाई, मसाला, पापड इत्यादी मशिनी वाटप करण्यात येतात. सन २०११ - १२ मध्ये २७ मशिनी मजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी गेल्या ३ वर्षात अजूनही ७ मशिनी मिळालेल्या नाहीत. या मशिनी तत्कालीन महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षांनी विकल्या असल्याने अद्याप मिळालेल्या नाहीत असा आरोप धनजय पिसाळ यांनी केला आहे. 

सन २०१४ - १५ मध्ये ५ कोटीचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यामधून अडीच कोटी रुपये मशिनी विकत घेण्यासाठी आहे. पालिकेकडे रोजगार निर्मितीसाठी कित्तेक महिलांनी अर्ज केले आहेत. अश्या महिलांनी १० टक्के रक्कम पालिकेकडे जमा केली आहे. परंतू अश्या महिलांनाही अद्याप मशिनी वितरीत करण्यात आल्या नाहीत असे पिसाळ यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS