अतिधोकादायक ५४३ इमारतींची यादी जाहीर - यादी अपडेट करा, वॉर्डांना फर्मान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अतिधोकादायक ५४३ इमारतींची यादी जाहीर - यादी अपडेट करा, वॉर्डांना फर्मान

Share This
पालिकेने एकूण ५४३ अतिधोकादायक इमारतींची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जारी केली आहे. ही यादी वॉर्डानेच सातत्याने अपडेट करण्याचे फर्मानही महापालिका आयुक्तांनी वॉर्ड ऑफिसरांना बजावले आहे. महापालिकेच्या  http://mcgm.gov.in या संकेतस्थळावर महापालिकेने ‘सी-१’ श्रेणीच्या इमारतींची यादी जाहीर केली आहे. या सर्वच्या सर्व ५४३ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करतानाच नागरिकांनी या धोकादायक इमारतीत राहू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. यायादीमध्ये कॅम्पाकोला फॅक्टरी, शिवाजी पार्क विद्युत दाहिनी, वादग्रस्त शक्ती मिल आणि ऐतिहासिक सिद्धार्थ विहार हॉस्टेलला पालिकेने अतिधोकादायक वास्तू म्हणून जाहीर केले आहे.  
पालिकेने जाहीर केलेल्या या धोकादायक इमारतींच्या यादीत चार दवाखाने आणि पाच स्मशानभूमींचा समावेश असून यामध्ये शिवडी क्रॉस रोड दवाखाना, आंबेवाडी म्युनिसिपल शाळा, अभ्युदयनगर दवाखाना, अभ्युदयनगर दवाखाना काळाचौकी आणि माहीम प्रसूतिगृहासह भायखळ्याची इरानियन शिमा इस्ना आश्रय स्मशानभूमी रेहमताबाद माझगाव, धारावी,  हिंदू स्मशानभूमी कार्यालय, इलेक्ट्रिक हिंदू स्मशानभूमी शिवाजी पार्क, मालाडची उंदेराई स्मशानभूमी आणि वालजी स्मशानभूमी अधिक अतिधोकादायक म्हणून जाहीर केले आहे.

५४३ इमारतींपैकी ७० इमारतींबाबत वाद होते. तांत्रिक समितीकडे हे प्रकरण पाच महिन्यांपूर्वी आले होते. या इमारतींपैकी अर्ध्या इमारती दुरुस्तीयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष लक्ष्मण व्हटकर यांनी सांगितले. धोकादायक इमारती वाढल्यास वा तोडल्यास तशी माहिती वॉर्डानेच संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना वॉर्ड ऑफिसरांना प्रशासनाने दिल्याचे व्हटकर यांनी स्पष्ट केले. महानगर पालिका प्रशासन धोकादायक इमारतींना नोटीस देण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. पालिकेच्या इमारती रिकाम्या करून त्या पाडण्याचा अधिकार पालिकेला आहे. मात्र खासगी इमारती पाडण्याचा अधिकार पालिकेला नसल्याने या इमारतींना नोटीसा देण्या पलीकडे काहीच करू शकत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

वॉर्डनिहाय इमारती
एल १००
एन ५६
आर/मध्य ३९
के/पश्‍चिम ३४
पी/दक्षिण २९
एम/पश्‍चिम २८
जी/उत्तर २७

अतिधोकादायक इमारती
एकूण इमारती ५४३
खासगी ३७९
महापालिकेच्या १०८
उपकरप्राप्त ०१
रेल्वेच्या ०७
सरकारी ४४

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages