राज ठाकरे यांचा निवडणूक लढविण्याबाबत यू टर्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 August 2014

राज ठाकरे यांचा निवडणूक लढविण्याबाबत यू टर्न

नागपूर : ठाकरे कुटुंबात यापूर्वी कुणीही निवडणूक लढवलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्र हा आमचा मतदारसंघ आहे, असे सांगत स्वत: विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचा खुलासा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी नागपुरात केला. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर मुंबईत मनसेच्या मेळाव्यात भाषण करताना आपण स्वत: विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे राज यांनी जाहीर केल्यानंतर ते कोठून लढणार याबद्दल चर्चा सुरू झाली होती. त्याला त्यांनीच पूर्णविराम दिला. 

राज म्हणाले, निवडणूक लढविण्याचा विचार मी केला होता. तशी घोषणाही मी केली होती. परंतु त्यानंतर बराच विचार केला. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, काका - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीही निवडणूक लढले नाहीत. आपणही एका मतदारसंघापुरते मर्यादित राहिलेलो नाही, असे सांगत त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत यू टर्न घेतला. रविवारी विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या नागपुरात मुलाखती घेतल्यानंतर विदर्भात ४०-४५ जागा मनसे लढविणार असल्याचे राज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS