मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांच्या स्मारकासाठी नाममात्र दराने भूखंड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 August 2014

मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांच्या स्मारकासाठी नाममात्र दराने भूखंड

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक नामदार नाना शंकर शेठ यांच्या स्मारकासाठी मुंबई महापालिकेकडून देण्यात येणारा भूखंड हा नाममात्र १ रुपया दराने देण्यात यावा, अशी उपसूचना प्रस्तावावर बोलताना आज पालिका सभागृहात सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली.सदर सूचना  पालिका सभागृहात सर्वानुमते मंजूर केल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी जाहीर केले 

माजी नगरसेवक मोहन चोणकर यांच्या पुढाकाराने नाना शंकर शेठ स्मारक समितीकडून गेली अनेक वर्षे नाना शंकर शेठ यांच्या स्मारकासाठी पालिकेकडे भूखंड देण्याची विनंती केली होती. या प्रस्तावास यश येऊन पालिकेकडून वडाळा येथील दोस्ती एकर येथील १५०० चौ. मीटरचा भूखंड स्मारका साठी मंजूर केला गेला . मात्र   किमत १ कोटी ८६ लाख लावण्यात आली . 

आज सभागृहात सदर प्रस्ताव आल्यावर सभागृह नेत्या तृष्णा विश्वास राव यांनी नामदार नाना शंकर शेठ यांच्या मुंबईसाठी केलेल्या समाजकार्याचे योगदान लक्षात घेउन ज्यांनी मुंबईच्या विकासासाठी स्वताच्या जागा दान केल्या हे विचारात घेऊन त्यांच्या स्मारकासाठी देण्यात येणाऱ्या भूखंडाची किमत म्हणून एक रुपया दर आकारावा  सूचना केली .  दरम्यान, महापौर सुनील प्रभू यांनी नानांच्या कार्याची महती लक्षात घेऊन सदर उपसूचने वर मत घेऊन सर्व सहमतीने ती मंजूर करत सदर प्रस्ताव मंजूर केला. 

Post Bottom Ad

JPN NEWS