आनंदराज आंबेडकर शिखंडी - डॉ. राजेंद्र गवई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आनंदराज आंबेडकर शिखंडी - डॉ. राजेंद्र गवई

Share This
रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या महापारीनिर्वान दिनाच्या माहोलाचा फायदा घेवून इंदू मिल मध्ये प्रवेश केला. यामुळे ते माझ्या दृष्टीने शिखंडी आहेत अशी टीका रिपाई गवई गटाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केली. 

रिपाई, आवामी विकास पार्टी, ओबीसी एनटी पार्टी, मायनोरीटी डेमोक्रेटिक पार्टी, आझाद विदर्भ सेना, रिपब्लिकन क्रांती दल, या पक्षांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या महाशक्तीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करताना गवई बोलत होते. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज यांनी आपल्याला गीनतीमध्ये घेत नसल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत बोलताना माझ्या पक्षाचे जितके नगरसेवक आहेत त्याच्या १० टक्के तरी नगरसेवक आनंदराज यांच्याकडे आहेत का असा प्रश्न उपस्थित करून आनंदराज यांच्या नावामागील आंबेडकर हे नाव काढल्यास आनंदराज शून्य असल्याची टीका गवई यांनी केली. 

भारिपचे बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्या सोबत यावे म्हणून आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आम्ही अजून अकोल्यातून उमेदवार जाहीर केलेले नाहीत. परंतू बाळासाहेब आंबेडकर सोबत न आल्यास त्यांच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे करून त्यांना खड्ड्यात पाडू असा इशारा गवई यांनी दिला. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages