मुख्यमंत्रिपदात स्वारस्य नाही! - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुख्यमंत्रिपदात स्वारस्य नाही! - उद्धव ठाकरे

Share This

राज्यातील आघाडी सरकारचे विसर्जन करा. माझे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न नाही, अथवा त्यात फारसे स्वरास्यही नाही. पण, मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा असल्याने, जनतेचे प्रश्न सोड‌वण्याची अपेक्षा माझ्याकडून केली जाते, म्हणून या राज्यात सत्ता हवी आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. 
लोहा येथे आयोजित केलेल्या शिवसेनेच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. या सभेत आपल्या 'व्हिजन डॉक्युमेंट'च्या प्रचारासोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नाव कायमचे पुसून टाका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत शिवसैनिकांनी विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय शांत बसू नये. शरद पवार यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वत:चा पक्ष बांधला, आता त्यांच्या पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. हे पवार यांना आता भोगावे लागत आहे. राष्ट्रवादी हा गद्दार पक्ष आहे. त्यामुळे त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे.'

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages