पालिका मुख्यालयाची सुरक्षा धोक्यात ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका मुख्यालयाची सुरक्षा धोक्यात !

Share This
Displaying cctv fire estinguish.jpg
फायर इस्टीनग्यूईश निकामी, सीसीटीव्ही जागेवर नाहीत 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मंत्रालयात लागलेल्या आगी नंतर सर्व शासकीय कार्यालयात फायर ऑडीट करण्याचे आणि आगी पासून संरक्षण करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वयित करण्याचे आदेश देण्यात आले होते. असेच आदेश पालिकेकडून आपल्या सर्व कार्यालयांना देण्यात आले असले तरी सध्या पालिकेच्या मुख्यालयात लावण्यात आलेले फायर इस्टीनग्यूईश यंत्रांची तारीख संपली असल्याने तसेच काही सीसीटीव्ही क्यामेरे नसल्याने मुख्यालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे. 

मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयामध्ये फायर इस्टीनग्यूईश यंत्र लावण्यात आली आहेत. हि यंत्रे वृत्तपत्रांनी झोड उठवल्या नंतर सप्टेंबर २०१३ मध्ये रिफील करण्यात आली होती. याची अंतिम मुदत सप्टेंबर २०१४ पर्यंत होती. मुख्यालयामधील फायर इस्टीनग्यूईश यांतारांची अंतिम तारीख संपून २० दिवस झाले तरी अद्याप पालिकेला जग आलेली नाही. एखाद्या वेळी पालिका मुख्यालयामध्ये आग लागल्यास या यंत्राचा कोणत्याही प्रकारे वापर करता येवू शकणार नाही. यामुळे पालिका मुख्यालयामध्ये येणाऱ्या हजारो कर्मचारी, अधिकारी व राजकीय नेत्यांचा जीव धक्यात येवू शकतो. 

एकीकडे पालिका मुख्यालयात फायर इस्टीनग्यूईश यंत्र निकामी झाली असताना काही सीसीटीव्ही क्यामेरे अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे. पालिका पत्रकार कक्षातून राधिका यादव या महिला पत्रकाराचा मोबाईल चोरी झाला आहे. याबाबत आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार नंडवली असता त्यांना पत्रकार कक्षाच्या बाहेरील सीसीटीव्हीचे फुटेज भेटल्यास त्वरित मोबिल चोराला पकडता येईल असे सांगण्यात आले. असे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला असता पत्रकार कक्षा जवळील सीसीटीव्ही क्यामेरा जागेवर नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास सीसीटीव्ही क्यामेरे नसल्याने दोषी लोकांना पकडण्यास अडचणी येणार आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages