विकासकांच्या इशार्यावरून पालिकेच्या एन विभागातील अधिकाऱ्यांकडून गरिबांची पिळवणूक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विकासकांच्या इशार्यावरून पालिकेच्या एन विभागातील अधिकाऱ्यांकडून गरिबांची पिळवणूक

Share This
Displaying IMG_20141019_111129.jpg
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेने अनधिकृत बेकायदेशीर बांधकामे तोडण्यासाठी काही नियम व कायदे बनवले आहेत. असे कायदे व नियम विकासक आणि बिल्डर यांना खुश करण्यासाठी घाटकोपरच्या एन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धाब्यावर बसवले जात असल्याचे उघड झाले आहे. 

घाटकोपर पश्चिम येथील काजूपाडा, भटवाडी येथील मंगलकृपा चाळीतील ३३ ते ३४ रहिवाश्यांची घरे विकासक आणि स्थानिक राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी पालिकेच्या एन विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून १० सप्टेंबरला गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी तोडली आहेत. याबाबत येथील रहिवाश्यांनी उच्च न्यालयात दाद मागितली असता पालिका अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत जुनी बांधकामे तोडायला अधिकार्यांना घाई का झाली, सुट्टीचे दिवस धरून नोटीसा दिल्या जातात यामुळे सबंधीताना न्यायालयात दाद मागता येणार नाही याची पुरेपूर काळजी अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. संबंधितानी न्यायालयात दाद मागितली असतात न्यायालय काय निकाल देते याची वाट न बघता तोडक कारवाही केली जाते, यामुळे अश्या अधिकाऱ्यांवर सिटी सिव्हिल कोर्टात केस चालावण्याचे आदेश दिले आहेत. 

आता पुन्हा सर्वोदय येथील भीमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठान कडून विधवा महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या पोळी भाजी केंद्राला अशीच ३१४ कलमान्वये शुक्रवारी १७ तारखेला नोटीस बजावण्यात आली आहे. जेणे करून नोटीस बजावल्या नंतर शनिवार आणि रविवार व दिवाळीची कोर्टाला असलेली सुट्टी यामुळे संबंधिताना दाद मागता येणार नाही याचा पुरपणे बंदोबस्त करण्यात आला आहे. पालिकेने या संस्थेची नोटीस पोळी भाजी केंद्राच्या बाहेर चिकटवून त्यावर एक लाकडाची फळी ठेवून हि नोटीस कोणाला लावली आहे याची माहिती पडणार नाही याची दाखल घेतली आहे. यामुळे एन विभागातील पालिका अधिकारी विकासक बिल्डर आणि राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर गरिबांना त्रास देत असल्याचे उघड होत आहे. 

याबाबत पालिका आयुक्त तसेच मुंबईच्या महापौरांनी दखल घेवून गरिबांना न्याय द्यावा तसेच बिल्डर विकासक यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान याबाबत एन विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages