भायखळ्याच्या मैदानावरील अतिक्रमणावर हातोडा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भायखळ्याच्या मैदानावरील अतिक्रमणावर हातोडा

Share This
मुंबई - भायखळा येथील डॉ. आंबेडकर रोडलगत असलेल्या नपु विद्यालयाच्या शाळेच्या मैदानात कच्छी ईशा ओसवाल स्थानिक जैन महासंघ या संस्थेने केलेल्या अतिक्रमणावर आज पालिकेचा हातोडा पडला. कडक पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली; मात्र संपूर्ण अतिक्रमणावर कारवाई न झाल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. अतिक्रमण पूर्णपणे काढून मैदान मोकळे करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. 


पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पालिकेचे सहायक आयुक्त संजय कबरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. पालिकेने या संस्थेच्या विश्‍वस्तांना गेल्या महिन्यात अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली होती. आज कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कबरे यांनी दिली. सकाळी 10 वाजता भोईवाडा पोलिस ठाण्याचा फौजफाटा तसेच पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक कारवाईसाठी घटनास्थळी पोहचताच येथील परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या कारवाईत संपूर्ण अतिक्रमण पाडण्यात आले नसल्याने कारवाईचे नाटक केल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. अतिक्रमण पूर्णपणे हटवल्यास स्थानिकांना मैदान मोकळे मिळेल, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages