महत्वाच्या स्थळी गतिरोधक बसवण्याची पालिकेस सुचना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महत्वाच्या स्थळी गतिरोधक बसवण्याची पालिकेस सुचना

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ): मुंबईतील अति महत्वाच्या ठिकाणी आणि जिथे अपघात घडतात त्या ठिकाणी किवा जास्त शक्यता आहे त्या ठिकाणी रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत अशी सुचना आज महा पालिकेच्या प्रभाग समस्या निवारण समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आली.  
मुंबईमध्ये शाळा, हॉस्पिटल्स, दवाखाने  अशा महत्वाच्या ठिकाणी गतीरोधक बसवण्यात आले पाहिजेत अशी सुचना यावेळी करण्यात आली , असे गती रोधक बसवण्यासाठी विविध प्रकारच्या परवानगी घ्याव्या  लागतात, त्यामुळे अशी कामे रखडतात . अशा विविध परवानगीची कामे मध्यवर्ती संस्थेला देण्यात यावीत , त्यामुळे कामे रेंगाळणार नाहीत आणि जलद कामे होतील अशी सुचना आज या समितीतील सदस्यांनी केली . या बैठकीमध्ये महापौर स्नेहल आंबेकर, आयुक्त सीताराम कुंटे , उप महापौर अलका केरकर, शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार आणि सर्व अतिरिक्त आयुक , नगरसेवक असे उपस्थित होते.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages