शाळा, कॉलेज परिसरात अमलीपदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नेमणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शाळा, कॉलेज परिसरात अमलीपदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नेमणार

Share This
नागपूर ( जेपीएन न्यूज ): मुंबईसह राज्यातील शाळा, कॉलेज परिसरात होणारी अमलीपदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नियुक्त करण्यात येईल अशी घोषणा गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली. याबाबत भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी प्रश्न विचारला होता. 


ठाणे, कळवा, मुंब्रा आणि मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांची विक्री केली जात आहे. यामध्ये विशेषतः शाळा, कॉलेजचे विद्यार्थी टार्गेट केले जातत याकडे विधानसभेच्या दोन्ही कडील सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बोलताना अॅड. आमदार आशिष शेलार यांनी काही अमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या शाळा कॉलेज मधील तरुणांना या व्यसनाधीनतेच्या जळत ओढत असून या टोळ्या शाळा आणि महाविद्यालय परिसरात सक्रीय आहेत. वांद्रे परिसरात अशा टोळ्या सक्रीय असल्याचे दिसून आले असून नेशनल कॉलेज परिसर आणि शास्त्री नगर, कुरेशी नगर वांद्रे येथील झोपडपट्टीत अशा अवैधरित्या अमली पदार्थ विकणाऱ्या  टोळक्यांना पकडण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या स्पेशल टीम तयार करून शाळा, कॉलेज, महाविद्यालय परिसरात  गस्त घालण्यात येतील काय ? असा प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी विचारला, त्याला उत्तर देताना गृहराज्य मंत्री यांनी सांगितले की, अशी पथके नियुक्त करण्यात येतील आणि शाळा कॉलेज परिसरात विशेष नजर ठेवण्यास त्यांना सांगण्यात येईल तसेच मेफेड्रोन (एमडी) हा ड्रगची विक्री राज्यात ठीकठिकाणी नव्याने झाल्याची उघड झाले आहे. त्यामुळे हा ड्रग एनडीपीसी मध्ये समविष्ट करण्याबाबत केंद्र सरकारला कळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages