उद्याने, मैदानांच्या खाली भुयारी मंडया बांधण्याची तरतूद नाही - आयुक्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उद्याने, मैदानांच्या खाली भुयारी मंडया बांधण्याची तरतूद नाही - आयुक्त

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ): महापालिकेच्या अखत्यारीतील उद्याने, मैदाने आदी ठिकाणी भुयारी मंडया बांधण्याची तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत नाही, असे महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे मंडयांचा विकास उद्याने, मैदाने यांच्या जमिनीखाली भुयारी स्वरूपात सद्य:स्थितीत करता येणार नाही, असे आयुक्तांनी म्हटले आहे. 

अधिकृत फेरीवाले तसेच मंडईतील गाळेधारकांचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणी भुयारी मंडया बांधल्या आहेत. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील उद्याने, मैदाने आणि मनोरंजन मैदाने आदी ठिकाणी भूयारी मंडया बांधून तेथे अधिकृत फेरीवाले तसेच वर्दळीच्या ठिकाणी नसलेल्या मंडईतील अधिकृत गाळेधारकांना स्थलांतरीत करावे, अशी मागणी गंगाधरे यांनी केली होती. 

याबद्दल आयुक्तांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे की, महापालिकेच्या विविध विभागाच्या मंजूर विकास नियोजन आराखड्यानुसार आवश्यक असणारी आरक्षणे ठेवली आहेत. त्याचप्रमाणे उद्याने, क्रीडांगणे, शाळा, मनोरंजन, मैदाने व मंडया आदींची तरतूद विकास नियोजन आराखड्यात केली आहे. गंगाधरे यांनी केलेल्या सूचनेनुसार मंडयांचा विकास उद्याने, मैदाने यांच्या जमिनीखाली भुयारी स्वरुपात सद्य:स्थितीत करता येणार नाही. उद्याने, मैदाने येथे भुयारी मंडयांचा विकास करता येणे शक्य आहे की नाही याबाबत संबंधित विभागांचे अभिप्राय, भौगोलिक स्थिती आदींचा विचार करून ही बाब प्रस्तावित विकास नियोजन पुनर्रचनेच्या पडताळणीसाठी विकास नियोजन आराखडा पुनर्रचना कक्षास सूचना देण्यात येतील, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages