राज्य शासनाकडून ८00 कोटींच्या रोख्यांची विक्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्य शासनाकडून ८00 कोटींच्या रोख्यांची विक्री

Share This
मुंबई : राज्य शासनाने १0 वर्षे मुदतीचे ८00 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले असून या कर्जाद्वारे राज्यातील विकासकामे केली जातील. कर्जरोख्यांचा कालावधी दहा वर्षांचा असेल. रोख्यांचा कालावधी २८ जानेवारी २0१५ पासून सुरू होईल. कर्जरोख्यांची परतफेड २८ जानेवारी २0२५ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे २७ जानेवारी रोजी त्यांच्या फोर्ट येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिड्स २७ जानेवारी रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्युशन, (ई-कुबेर) सिस्टिमनुसार सादर करावयाची आहेत. यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्युशन (ई-कुबेर) सिस्टिमनुसार सकाळी १0.३0 ते दुपारी १२ वाजेपर्यंत त्याचप्रमाणे अस्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्युशन (ई-कुबेर) सिस्टिमनुसार सकाळी १0.३0 ते ११.३0 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिड्सकडून रकमेचे प्रदान २८ जानेवारी २0१५ रोजी करण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages