मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करताना रेल्वे रूळ ओलांडताना, धावत्या लोकलमधून पडून, खांबाला धडकून, फलाटाच्या गॅपमध्ये पडून, टपावरून प्रवास करताना ओव्हरहेड वायरच्या सान्निध्यात येऊन मृत्युमुखी पडणार्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. या संख्येमध्ये महिला प्रवाशांपेक्षा पुरुष प्रवाशांची संख्या जास्त आहे. लोहमार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार एका वर्षात २९९८ पुरुष, तर ४२५ महिला प्रवाशांचा अपघात झाला आहे.
मुंबईकरांना कितीही बजावून सांगितले तरी रेल्वे रूळ ओलांडण्याचा मोह टाळता येत नाही. रेल्वे रूळ ओलांडताना ६0४ पुरुष, तर ९२ महिलांचा समावेश आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढतच आहे. धावत्या गाडीतून पडून अपघात झाल्याचे प्रमाणदेखील वाढले असल्याचे समोर आले आहे. मागील एका वर्षात धावत्या गाडीतून पडून अपघात होणार्यांची संख्या ८00च्या घरात पोहोचली आहे.
गर्दीच्या वेळेत लोकलला लोंबकळत जात असताना खांब्याला धडकून ११ जणांचा तर टपावरून प्रवास करताना ओव्हर हेडवायरच्या सान्निध्यात आल्यामुळे २८ जणांचा मृत्यू झाला आहे. लोकलच्या प्रवासात आजारामुळे नैसर्गिक मृत्यू होणार्यांमध्ये पुरुषांची संख्या ४१0 असून महिलांची संख्या ५८ आहे, तर रेल्वेच्या हद्दीत आत्महत्या करणार्यांची संख्या ३३ असून, फ्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये पडून मृत्यू होणार्यांची संख्या ३४ असल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसटी, दादर, कुर्ला, डोंबिवली, कल्याण, कर्जत स्थानकांदरम्यान तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली, अंधेरी, पालघर, चर्चगेट, बांद्रा या स्थानकांदरम्यान सर्वाधिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात कल्याण स्थानकात ४३४, ठाणे स्थानकात ३४८, कुर्ला स्थानकात ४१७, बोरिवली स्थानकात ३0७, वसई स्थानकात ३0२ जणांचा समावेश आहे. फक्त एका वर्षात ३ हजार ४२३ जणांचा विविध कारणांवरून अपघाती बळी गेल्याने हे मृत्युचे वाढते प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.