मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला सहा महिन्यांपूर्वी सरप्लसच्या माध्यमातून मिळालेल्या ६६0 घरांचा मास्टर लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. एन. रामास्वामी यांनी हिरवा कंदील दाखवला असून आगामी काळात ही घरे सर्वसामान्यांना मिळणार आहेत.
म्हाडाला पुनर्विकासाच्या माध्यमातून सरप्लस एरिया मिळतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अनेक विकासकांनी सरप्लस एरिया देण्यास टाळाटाळ केल्यामुळे हजारो घरांचा तुटवडा निर्माण झाला होता. गेल्या महिनाभरात अशा विकासकांवरील कारवाई तीव्र करण्याचे धोरण दुरुस्ती मंडळाने स्वीकारले आहे. म्हाडाच्या भायखळा, चिखलवाडी आणि विविध ठिकाणांमधून पुनर्विकासाच्या माध्यमातून सहा महिन्यांपूर्वी म्हाडाला ६६0 घरांचा ताबा मिळाला होता. मात्र या घरांकडे माजी अधिकार्यांनी दुर्लक्ष केले, मात्र नवे मुख्य अधिकारी रामास्वामी यांनी या सर्व घरांची झाडाझडती घेतली. आगामी काळात ही घरे मास्टर लिस्टमधून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळाकडून धोकादायक तसेच दुर्घटनाग्रस्त इमारतींच्या रहिवाशांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मास्टर लिस्टची प्रक्रिया सुरू केली होती. या मास्टर लिस्ट प्रक्रियेदरम्यान हजारो रहिवाशांकडून अर्ज प्राप्त झाले होते. त्यांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतरच अशा अर्जदारांना मास्टर लिस्टमध्ये सामावून घेण्यात येत होते. या ६६0 घरांमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.