मुंबई : महापालिकेच्या शिक्षण विभागाशी जोडलेली ५५ वाचनालये बंद पडली असून, काही वाचनालये काही संस्थांना चालवण्यास दिल्या आहेत. ही वाचनालये चालवण्यासाठी कर्मचार्यांची पुरेशी संख्या आवश्यक असताना, शिक्षण अधिकारी शांभवी जोगी वाचनालये चालवण्यासाठी उदासीन आहेत. वाचनालय शिक्षण विभागापासून विभक्त करण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली.
मुंबईतील वाचनालये जुनी असून, ती चालवण्यासाठी 'अटेंडंट', लिपिक, ग्रंथपाल, शिपाई आदी कर्मचार्यांची आवश्यकता आहे. ही वाचनालये सुरू राहिली तर मुंबईतील मुलांना वाचण्याची सवय (रिडिंग कल्चर) लागेल, असे सांगून शेख म्हणाले, वाचनालयासाठी ४ अटेंडंट, ९ लिपिक, ७ शिपाई आणि एक ग्रंथपाल यांची पदे रिक्त आहेत. शिपायांची पदे भरण्यासाठी परीक्षाही झाल्या पण ही पदे अजूनही रिक्त आहेत. यासंदर्भात मुलुंडच्या पीके रोडवर असलेल्या वाचनालयाचे उदाहरण त्यांनी या वेळी दिले, तर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक याकुब मेमन यांनी पत्रकारांना सांगितले, पायधुनी येथील काझी इस्माईल खत्री महापालिका वाचनालय ८0 वर्षे जुने आहे. तेथे असलेली ग्रंथसंपदा खराब झाली आहे. यामुळे या जुन्या 'सेस' इमारतीची दुरुस्ती करणे आवश्यक होते. त्यासाठी अडीच लाख रुपयांचा निधी घरदुरुस्ती मंडळाने देऊन तात्पुरती दुरुस्ती केली आहे. हे वाचनालय चालवण्याची तयारी 'नाथानी चॅरिटेबल ट्रस्ट'ने दाखवली आहे. पण शिक्षणाधिकारी शांभवी जोगी याबाबत काही निर्णय घेण्यासाठी तयार नाही. म्हणून शिक्षण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांसोबत यासंबंधी बैठक घेऊन चर्चा करणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शेख यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे केली. हा निधी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली. भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनीही त्यांना पाठिंबा दिला.