नवी दिल्ली : जागतिक पातळीवर विकसनशील राष्ट्र म्हणून ओळखले जाणार्या तर आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येणार्या भारतावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीत भारतावर तब्बल ६८ अब्ज डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार ४२0७ अब्ज रुपयांचे विदेशी कर्ज आहे. त्यातील मोठी रक्कम ही सरकारकडून वारंवार घेण्यात आलेल्या कर्जाची असल्याची बाब माहिती अधिकाराद्वारे समोर आली आहे.
अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक कार्य विभागाकडून माहिती अधिकार कायद्यान्वये मागवण्यात आलेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर २0१४ पर्यंत देशावर ४,२0७,३३३,२४५,८५९ रुपयांचे कर्ज आहे. यातील सरकारकडून घेण्यात आलेल्या कर्जाची रक्कम ही ३,६६१,0४९,५९५,३३३ रुपये इतकी आहे. अमेरिका, र्जमनी, फ्रान्स, जपान, रशिया, स्वित्झर्लंड, आशिया विकास बँक, ओपेक, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी, आंतरराष्ट्रीय विकास संघ, आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास बँक आदींकडून हे कर्ज घेण्यात आले आहे. हिसारमधील आरटीआय कार्यकर्ते रमेश वर्मा यांनी अर्थ मंत्रालयाकडून देशावर किती विदेशी कर्ज असल्याची माहितीची विचारणा केली असता ही बाब समोर आली. आशिया विकास बँक (एडीबी)चे ८,९५६,८६३,९९ डॉलर्स, आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास बँकेचे ८,९0५,४५६,८२३ डॉलर्स, ओपेकचे २१,२८४.२१५ डॉलर्स, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे ३५४,४६३,३४१ डॉलर्स, आंतरराष्ट्रीय विकास संघाचे २,५९३,३१६,७९४ डॉलर्स, र्जमनीचे २,३४0,३११,२५८ डॉलर्स, फ्रान्सचे ३८६,९३६,0३८ डॉलर्स, इटली ३४१,६६२ डॉलर्स, जपान १,१४६,४७६,४२७ डॉलर्स, रशिया ८,७८,५२८,१८८ डॉलर्स, स्वित्झर्लंडचे १,४३४,८६८ डॉलर्स तसेच अमेरिकेचे २२१,२३३ डॉलर्सचे कर्ज आहे.