काँग्रेस सरकारने झोपडपट्टीवासीयांच्या हितासाठी २000 सालापर्यंतच्या झोपडीलादेखील संरक्षण दिले होते. त्यांच्या पुनर्वसनासाठी राजीव आवास योजना राबवण्यात कसूर करू नये अन्यथा मुंबईतील तमाम झोपडपट्टीवासी रस्त्यावर उतरतील, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी राज्य सरकारला दिला. काँग्रेसच्या स्लम सेलच्या वतीने घाटकोपर येथील गंगावाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या मेळाव्यात चांदूरकर बोलत होते .
मेळाव्याचे आयोजक स्लम सेलचे मुंबई अध्यक्ष अर्जुन हिवाळे यांनी आपल्या भाषणात मुंबई पोर्ट ट्रस्ट, मिठागर व वनजमिनीवरील झोपडपट्टीतदेखील एसआरए योजना तातडीने कार्यान्वित केली गेली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच पाच वर्षांच्या आत विकासकाने सर्व नाहरकत प्रमाणपत्रांसह बांधकाम सुरू न केल्यास विकासक बदलण्याची सोसायटीला मुभा मिळायला हवी, याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. मेळाव्याचे निमंत्रक ईशान्य मुंबई स्लम सेलचे अध्यक्ष सत्तार खान यांनी एसआरए योजनेत अपात्र करण्यात आलेल्या, नाला-रस्ता रुंदीकरण, पाइपलाइनलगतच्या सर्व अपात्र झोपडीधारकांची उपजिल्हाधिकारी किंवा महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी जनसुनावणी घेऊन त्यांची पात्रता सिद्ध केली पाहिजे अन्यथा स्लम सेलच्या वतीने मुंबईभर तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा खान यांनी आपल्या भाषणात दिला.