चुनाभट्टी, शिवडी येथील फाटक आजपासून गर्दीच्या वेळेस बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चुनाभट्टी, शिवडी येथील फाटक आजपासून गर्दीच्या वेळेस बंद

Share This
मुंबई : उपनगरीय मार्गावर असणार्‍या फाटकांमुळे लोकल गाड्या रोजच लेट होतात. त्यामुळे उपनगरीय लोकल गाड्यांचे वेळापत्रक बिघडते. परिणामी, फाटक बंद करण्यात यावीत, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्यानुसार मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील चुनाभट्टी आणि शिवडी येथील लेव्हल क्रॉसिंग गेट सक ाळी आणि संध्याकाळच्या पीक अवरच्या वेळेस बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

हार्बर मार्गावर चुनाभट्टी आणि शिवडी या दोन ठिकाणी लेव्हल क्रॉसिंग गेट (फाटक) आहे. हे फाटक दिवसातून अनेकदा उघडले जात असल्यामुळे अनेकदा लोकल थांबवल्या जातात. त्याचा लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. त्यामुळे हे फाटक मंगळवारपासून गर्दीच्या वेळेस बंद करण्यात येणार आहेत. शिवडी येथील फाटक हे सकाळी ७.४0 ते १0.५0 आणि संध्याकाळी ५.१0 ते रात्री ८.२0 या वेळेत, तर चुनाभट्टी स्थानकाजवळील फाटक हे सकाळी ७.२५ ते १0.३0 आणि संध्याकाळी ५.१५ ते रात्री ८.३५ या वेळेत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही, अशी आशा मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages