मरे करणार ट्रॅकचे मॉनिटरिंग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मरे करणार ट्रॅकचे मॉनिटरिंग

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळाला तडे जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनातर्फे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील रेल्वे रुळांचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे.

मंगळवारी रात्री (१३ जानेवारी) हार्बर मार्गावर सीएसटी ते पनवेल स्थानकांदरम्यान मॉनिटरिंग ट्रेन चालवण्यात येणार आहे. ही मॉनिटरिंग ट्रेन सीएसटीहून रात्री १ वाजून १0 मिनिटांनी सुटणार असून पनवेलला रात्री २ वाजून १५ मिनिटांनी पोहचणार आहे. तर पनवेलहून रात्री २ वाजून ३0 मिनिटांनी सुटणारी ट्रेन सीएसटीला पहाटे ३ वाजून ३५ मिनिटांनी पोहचणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर गुरुवारी रात्री (२२ जानेवारी) नेरूळ ते ठाणे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. ही मॅानिटरिंग ट्रेन नेरूळहून रात्री २ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून ठाण्याला रात्री २ वाजून ४५ मिनिटांनी पोहचणार आहे. तर ठाण्याहून रात्री २ वाजून ५५ मिनिटांनी सुटणारी ट्रेन नेरूळला पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी पोहचणार आहे. ही मॉनिटरिंग ट्रेन नॉनस्टॉप चालवण्यात येणार असल्यामुळे रेल्वे ट्रॅकच्या शेजारी राहणार्‍या नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, रात्रीच्या वेळी ट्रॅक ओलांडू नयेत, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages