आरटीओमध्ये दलालांना बंदी घातल्यानंतर आणि अधिकारी-कर्मचार्यांची झाडाझडती घेतल्यानंतर परिवहन आयुक्तांनी शुक्रवारी वडाळा आरटीओला अचानक भेट दिली. या भेटदरम्यान त्यांनी आरटीओमध्ये आलेल्या नागरिकांना मिळणार्या विविध सेवांचा आढावा घेतला. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी लागणार्या फॉर्म्सच्या उपलब्धतेबद्दल माहिती घेतली.
परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी शुक्रवारी वडाळा येथील आरटीओ कार्यालयाला भेट दिली. पूर्व उपनगरातील नागरिकांना अद्ययावत आरटीओचे कार्यालय मिळावे यासाठी विक्रोळी आणि घाटकोपर येथील जागेच्या प्रकरणाचा आढावा त्यांनी या वेळी घेतला. तसेच एमएमआरडीए येथील इतर इमारती परिवहन सेवेसाठी वापरण्याविषयी तात्पुरत्या स्वरूपात घेण्याबद्दलच्या बाबींचा देखील आढावा घेतला. तसेच जागेस प्रत्यक्ष भेट दिली. मुंबई (पूर्व) कार्यालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील आठवड्यात जागेशी संबंधित जागा मालक आणि विकासक तसेच आधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याबद्दल सूचना केल्या. या भेटीदरम्यान आयुक्तांनी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांसोबत चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शिकाऊ लायसन्ससाठी घेण्यात येणार्या संगणकीय चाचणी कक्षास भेट दिली व चाचणीमध्ये अवलंबवण्यात येणार्या प्रक्रियेची माहिती देखील घेतली. सध्या शिकाऊ लायसन्ससाठी असलेले मोठे आरक्षण कमी करण्यासाठी त्यांचे विकेंद्रीकरण कसे करता येईल, या विषयीसुद्धा लवकरच प्रक्रिया सुरू करण्याविषयी चर्चा केली. या भेटीदरम्यान आयुक्तांनी आरटीओमध्ये पळापळ करणार्या एका रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधीची झाडाझडती घेतली, त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांच्या आधारे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.