लालबाग राडा प्रकरण - चिथावणीखोर मॅसेज, फोटो पाठवणार्‍यांविरोधात गुन्हा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लालबाग राडा प्रकरण - चिथावणीखोर मॅसेज, फोटो पाठवणार्‍यांविरोधात गुन्हा

Share This
लालबाग येथे दोन गटांत झालेल्या मारामारीला दंगलीचे रूप देण्यासाठी चिथावणीखोर मॅसेज, फोटो पाठवणार्‍यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचे मॅसेज एकाच वेळी अनेक जणांना पाठवले गेले असून त्यामागे दंगल घडवण्याचा नियोजित कट असल्याची शक्यता मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी वर्तवली आहे.

४ जानेवारी रोजी रात्री लालबाग येथे दोन गटांत किरकोळ वादावरून हाणामारी झाली होती. त्यामुळे परळ, चिंचपोकळी, वरळी अशा भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याचा समाजकंटकांनी गैरफायदा घेत व्हॉट्सअँप, ट्विटर, एसएमएसच्या माध्यमातून लालबागमध्ये जातीय दंगल भडकल्याचे चित्र निर्माण केले गेले, अशा मॅसेजचा ओघ मोठय़ा प्रमाणात सुरू झाला. त्याचा वापर अनेक दिवस सुरू होता. जाणीवपूर्वक घटनेशी संबंधित नसलेले मॅसेज, क्लिप्स पाठवले जात होते. हा एक कटाचा भाग असण्याची शक्यता सोमवारी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी व्यक्त केली. शहरात दंगल भडकवण्याच्या उद्देशाने समाजकंटकांनी हेतुपुरस्सर प्रयत्न केले. मात्र, नागरिकांनी संयम बाळगल्याने मुंबईत अशांतता पसरवण्याचा प्रकार अपयशी ठरला. 

खोटे मॅसेज पाठवणार्‍यांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले असून सायबर सेल, गुन्हे शाखेची विशेष शाखा यातील समाजकंटकांचा शोध घेत आहेत. अशा आरोपींच्या शोधासाठी पोलीस व्हॉट्सअँप, ट्विटर असे नेटवर्क पुरवणार्‍या कंपन्यांची मदत घेत असल्याचे मारिया यांनी या वेळी सांगितले. मॅसेज पाठवणार्‍यांकडून ४ जानेवारी रोजी ज्या मुलाचा मारामारीत जखमी झाल्याचा फोटो पाठवण्यात येत होता तो माझगाव कोर्टाबाहेरील रस्ते अपघातात जखमी झालेला मुलगा होता. त्याचबरोबर मनीष मार्केटबाहेर मराठी नंबर प्लेट असलेल्या बाइक फोडण्यात येत असलेली व्हिडीओ क्लिप कर्नाटक येथील असल्याचे राकेश मारिया यांनी उघड केले. एखाद्या घटनेविषयी कुठलीही माहिती नसताना त्यांच्याशी संबंधित मॅसेज फॉरवर्ड करू नये, त्याची माहिती तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहनही या वेळी मारिया यांनी केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages