अंगणवाडी सेविकांचा थाळी नाद मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अंगणवाडी सेविकांचा थाळी नाद मोर्चा

Share This
मुंबई / प्रतिनिधी - अंगणवाडी कर्मचार्याना ओक्टोबर २०१४ पासून थकित मानधनाची रक्कम देवून त्यांची व त्यांच्या कुटुम्बीयांची उपासमार थांबवावी अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आजाद मैदानात थालीनाद मोर्चा काढण्यात आला.
 
एकात्मिक बालविकास सेवे अंतर्गत ८८२७२ अंगणवाडी सेविका, ८८२७२ मदतनिस व ११ हजार मिनी सेविका काम करत आहेत. सेविकाना ४ हजार तसेच मदतनीस व मिनी सेविकाना २ हजार दरमहा राज्य सरकार मानधन देत आहे. २०१४ मधे कर्मचार्याना वेळेवर मानधन देण्यात आलेले नाही. यामुले ओक्टोबर २०१४ पासून कर्मचारी आणि कुटुम्बीयांची उपासमार होत आहे. सेविकाना दरमहा ९५०, मदतनिसाना ५००, मिनी सेविकाना ५०० रुपये मानधनवाढ देण्याचे आदेश १ एप्रिल २०१४ला देण्यात आले. भाऊबीज म्हणून एक हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले नाही. ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. याबाबत वेळोवेळी मोर्चे निदर्शने करण्यात आली. मंत्र्यानी आश्वासने दिली मात्र सरकारने निधी दिला नसल्याने अद्याप कर्मचार्याना मानधन देण्यात आलेले नाही. यामुले आपल्या विविध प्रलम्बित मागण्यासाठी अंगनवाडी सेविकानी थाली नाद मोर्चा काढण्यात आला अशी माहिती बृजपाल सिंग यानी दिली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages