मुंबईत एसीपी, सीनियर पीआयच्या बदल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत एसीपी, सीनियर पीआयच्या बदल्या

Share This
मुंबई : मुंबई पोलीस दलात बुधवारी मोठय़ा प्रमाणात अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. बदली करण्यात आलेल्यांत चार सहाय्यक आयुक्त, २३ वरिष्ठ निरीक्षक, चार निरीक्षक, एक सहाय्यक तर चार उपनिरीक्षकांचा समावेश आहे. 


सोमवारी येणार्‍या २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तासाठी पोलीस दल अपुरे पडू नये म्हणून अनेक पोलीस ठाण्यांतील रिक्त पदे भरण्यात आली. लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेल्या अधिकार्‍यांमुळे वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या आयुक्तांनी केल्या होत्या. त्या रिक्त जागाही भरल्या. ज्या चार सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या, त्यात सुधाकर पुजारी, अशोक वस्त्रद, प्रदीप लोणंदकर व जिवाजीराव जाधव यांचा समावेश आहे. पुजारी यांची नियुक्ती बोरिवली विभाग, वस्त्रद यांची मेघवाडी विभाग, लोणंदकर यांची नियुक्ती पश्‍चिम नियंत्रण तर जाधव यांनी पूर्व नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून आजारीपणाच्या रजेवर असलेले डी.एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांची बदली विशेष शाखा १मध्ये झाली. तर वर्सोवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षिका अरुंधती राणे यांची बदली पश्‍चिम नियंत्रण कक्षात करण्यात आली. गणेश रेकूळवाड यांची वाहतूक शाखा, विनय कुलकर्णी यांची वरळी पोलीस ठाणे, बाळकृष्ण गुरव यांची येलो गेट, चंद्रकांत गुरव यांची दक्षिण नियंत्रण कक्ष, धनाजी नलावडे यांची डी.एन. नगर, प्रकाश गोसावी यांची मानखुर्द, शिवाजी कदम यांची नागपाडा, मिलिंद खेतले यांची मालाड, सुधाकर शिंदे यांची पश्‍चिम नियंत्रण कक्ष, बाळासाहेब जाधव यांची शिवाजी नगर, शेखर तावडे यांची काळाचौकी, विलास कानडे यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, ज्ञानेश्‍वर जवळकर यांची संरक्षण व सुरक्षा, आनंद कोळी यांची पूर्व नियंत्रण कक्ष, सुनील जैन यांची विशेष शाखा-१, अरुण माने यांची संरक्षण व सुरक्षा शाखा, भाऊसाहेब टाव्हरे यांची बांगुर नगर पोलीस ठाणे, संजय जाधव यांची खेरवाडी, रामचंद्र गायकवाड यांची चारकोप, रवींद्रनाथ पवार यांची वर्सोवा, धनराज गायकवाड यांची संरक्षण व सुरक्षा, अशा वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. 

पोलीस निरीक्षक राजेश नंदीमठ, सुरेंद्र मोरये, रघुनाथ दळवी व अब्दुल बागवान या सर्वांच्या बदल्या सशस्त्र पोलीस दलात करण्यात आल्या. तसेच सहाय्यक निरीक्षक जयवंत मते, उपनिरीक्षक संजय चव्हाण, दिलीप अहिरे, विजय जाधव व दीपक जाधव यांच्याही बदल्या सशस्त्र पोलीस दलात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages