नवी दिल्ली : मागील यूपीए सरकारच्या कारकीर्दीत करण्यात आलेल्या जातीय जनगणनेची आकडेवारी लवकरच सार्वजनिक करण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी येथे बोलताना दिले.
यूपीए सरकारने देशातील लोकसंख्येची जाती आधारित जनगणना केली होती. ही आकडेवारी गतवर्षीच जारी करण्यात येणार होती. मात्र, काही कारणामुळे ती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. याविषयी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सरकार जाती आधारित जनगणनेची आकडेवारी जारी करणार काय? असा प्रश्न केला असता, त्यांनी असे केले जाऊ शकते, असे स्पष्ट केले. गृहमंत्रालयाने २0११ पर्यंतची ही आकडेवारी सार्वजनिक करण्यास मंजुरी दिली असून ती लवकरच जारी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे. ही गणना जनरल रजिस्ट्रार व जनगणना आयोगाने केली होती. हा विभाग केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. या जनगणनेत २0११ पर्यंतची देशातील लोकसंख्येची जातीनुरूप आकडेवारी दर्शवण्यात आली आहे. दरम्यान, विश्लेषकांनी अशी आकडेवारी संकलनानंतर ३ वर्षांच्या आत जारी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.