मुंबई / अजेयकुमार जाधव / http://jpnnews.webs.com
मुंबई मध्ये गेल्या काही वर्षात गुन्ह्यांच्या संखेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढते गुन्हे रोखण्यात पोलिसांना अपयश येत असताना दुसरीकडे मात्र मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात येणाऱ्यांच्या संखेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे मुंबई पोलिसानी माहिती अधिकारातून दिलेल्या माहिती वरून स्पष्ट होत आहे.
मुंबई पोलिसांनी २००१ पासून किती लोकांना अटक केली, किती आतंकवाद्यांचा पोलिसांनी या कालावधीत खातमा केला याची सविस्तर माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी मागवली होती. याबाबत माहिती देताना सन २००१ पासून किती आतंकवाद्यांचा खातमा केला याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे नसल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारी नुसार सन २००१ पासून सन २०१४ पर्यंत १४ वर्षात ४ लाख ३५ हजार ७२९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
सन २००१ मध्ये २८८७४, २००२ मध्ये २६२७५, २००३ मध्ये २५६८६, २००४ मध्ये २९०९३, २००५ मध्ये ३१०९४, २००६ मध्ये ३०७५९, २००७ मध्ये ३०१९७, २००८ मध्ये ३२५२०, २००९ मध्ये ३०९५७, २०१० मध्ये ३३६४५, २०११ मध्ये ३२१९१, २०१२ मध्ये ३००३६, २०१३ मध्ये ३४४४२, तर सन २०१४ मध्ये ३९९६० जणांना पोलिसांनी अटक केले असल्याचे गुन्हे शाखेकडून कळविण्यात आले आहे.
