डॉ. आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान राज्य सरकार विकत घेणार - विनोद तावडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान राज्य सरकार विकत घेणार - विनोद तावडे

Share This
मुंबई दि.२४ जानेवारी- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील आपले वास्तव्य ज्या घरात होते ते घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार असून या बाबतच्या गाठीभेटी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लंडन येथे पूर्ण केल्या. 

१९२१-२२ असे दोन वर्षे लंडन येथील ज्या घरात डॉ.बाबासाहेब यांचे वास्तव्य होते ते घर घरमालकानो विक्रीस काढले होते. याबाबात बुध्दीस्ट फोरम च्या श्रीमती संतोष दास पाठपुरावा करत होत्या. दरम्यान सरकारकडून याबाबत काहीच हालचाली न झाल्याने हे घर इस्टेट एजंट द्वारा विक्रीस काढले गेले. जागतिक शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेसाठी विनोद तावडे लंडन येथे गेले आहेत. यावेळी विनोद तावडे यांनी यासंदर्भात संस्थेच्या अध्यक्षा दास यांच्याशी संपर्क साधला व व्यवहाराची माहीती घेतली. हे घर सुमारे ३५ कोटी रुपयांनी विकण्यात येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दावोस येथे संपर्क करुन राज्य सरकारने हे घर विकत घ्यावे याबाबतचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर तावडे यांनी तातडीने बुध्दीस्ट फोरम आणि भारतीय उच्चायुक्तचे अधिकारी यांच्यासमवेत डॉ.बाबासाहेब यांच्या त्या निवासस्थानाला भेट दिली. त्यानंतर इंडिया हाऊस मध्ये ब्रिटीश उच्चायुक्त .रंजन मथाई,  बुध्दीस्ट फोरमच्या संतोष दास, तेथील उच्च अधिकारी यांची संयुक्त बैठक तावडे यांनी घेतली आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन तसेच कायदेशीर बाबी तपासून आणि परराष्ट्र खरेदीचे नियम पूर्ण करुन पुढील २ महिन्यात यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

१४ एप्रिल २०१५ या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला लंडनमधील डॉ.बाबासाहेब यांचे निवासस्थान स्मारक म्हणून जनतेला खुले करता येईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहीती तावडे यांनी दिली

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages