मुंबई / प्रतिनिधी - बॉम्बे मर्कन्टाईल को. ऑप. बँकेची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार होत असल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याची माहिती अख्तर रंगुनवाला व मुशाहिद सिद्दिकी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
बॉम्बे मर्कन्टाईल बँकेच्या निवडणुकी दरम्यान अनेक सभासदांचा मृत्यू झाला आहे, त्यांची नवे वगळण्यात आलेली नाहीत, मृत्यू पावलेल्या सभासदांच्या वर्षांची नवे नव्या यादी मध्ये समाविष्ट केलेली नाहीत, कित्तेक सभसदांचे राहण्याचे पत्ते बदलले आहेत तरीही नव्या यादी मध्ये ते अद्यावत केलेले नाही. दक्षिण मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात सभासद असताना मतदान केंद्र मात्र नवी मुंबई मधील खारघर येथे निश्चित करण्यात आले आहे यामुळे असंख्य सभासदांची गैरसोय होणार असल्याने बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवर आपण बहिष्कार टाकत आहोत. निवडणुकीमध्ये १२ पैकी ६ संचालकांचा निवडणूक अर्ज मंजूर असला तरी या निवडणुकीला विरोध असल्याने आमचे ४ संचालक निवडणूक लढवतील इतर दोघे या निवडणुकीवर बहिष्कार कायम ठेवतील असे अख्तर रंगुनवाला व मुशाहिद सिद्दिकी यांनी पत्रकारांना सांगितले.
