मुस्लिम लोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढली ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुस्लिम लोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढली !

Share This
नवी दिल्ली : गेल्या दशकभरात (२00१-११) देशातील मुस्लिमांची लोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढली असून एकूण लोकसंख्येतील या समुदायाचे प्रतिनिधित्व १३.४ टक्क्यांहून वाढून १४.२ टक्क्यांवर पोहोचले आहे. अल्पसंख्याक समुदायातील हा वृद्धी दर राष्ट्रीय लोकसंख्येच्या सरासरी (१८ टक्के) वृद्धी दरापेक्षा अधिक आहे, हे विशेष.

धर्मनिहाय जनगणनेच्या आकडेवारीनुसार, देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत जम्मू-काश्मिरात मुस्लिमांची सर्वाधिक ६८.३ टक्के लोकसंख्या आहे. त्यानंतर आसामात ३४.२ टक्के, तर पश्‍चिम बंगालमध्ये २७ टक्के मुस्लिम आहेत. १९९१-२00१ या कालावधीत मुस्लिम लोकसंख्येचा वृद्धी दर २९ टक्क्यांच्या आसपास होता. २0११च्या जनगणनेत ५ टक्क्यांची घसरण झाली असली तरी मुस्लिम लोकसंख्येतील २४ टक्क्यांचा वृद्धी दर १८ टक्क्यांच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. मुस्लिमांची लोकसंख्या आसामात सर्वाधिक वाढली आहे. २00१मध्ये आसामात मुस्लिमांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ३0.९ टक्के एवढी होती. त्यानंतर आता ती वाढून ३४.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. आसाम गेल्या ३ दशकांपासून बांगलादेशातून होणार्‍या अवैध स्थलांतराचा सामना करत आहे. मणिपूर या एकमेव राज्यात मुस्लिमांची संख्या ८.८ टक्क्यांहून ८.४ टक्क्यांवर घसरली आहे. पश्‍चिम बंगालमध्येही अवैध शरणार्थींचा मुद्दा ज्वलंत आहे. २00१च्या जनगणनेनुसार बंगालमध्ये २५.२ टक्के मुस्लिम होते. २0११मध्ये त्यांची संख्या १.८ टक्क्यांनी वाढून २७ टक्क्यांवर पोहोचली आहे. मुस्लिम लोकसंख्येचा हा वृद्धी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. उत्तराखंडमध्येही मुस्लिमांची संख्या वाढून ती ११.९ टक्क्यांहून १३.९ टक्क्यांवर पोहोचली आहे. २0११च्या जनगणनेनुसार अन्य राज्यांतही मुस्लिमांच्या लोकसंख्येत उल्लेखनीय वाढ झाली असून, यात केरळ (२४.७ टक्क्यांहून २६.६ टक्के), गोवा (६.८ टक्क्यांहून ८.४ टक्के), जम्मू-काश्मीर (६७ टक्क्यांहून ६८.३ टक्के), हरयाणा (५.८ टक्क्यांहून ७ टक्के), दिल्ली (११.७ टक्क्यांहून १२.९ टक्के) यांचा समावेश आहे. केंद्रशासित प्रदेशांत लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक ९६.२ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. जनरल रजिस्ट्रार व जनगणना आयुक्तांनी धर्मनिहाय जनगणना केली होती. मात्र, मागील यूपीए सरकारने ती सार्वजनिक केली नव्हती. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारीच ही आकडेवारी लवकरच जारी करण्याचे संकेत दिले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages