२६ फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प
२८ फेब्रुवारी देशाचा अर्थसंकल्प
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अर्थमंत्री अरुण जेटली २८ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अधिवेशनात सरकारपुढे नुकत्याच काढलेल्या ६ वटहुकुमांचे कायद्यात रूपांतर करण्याचे तगडे आव्हान आहे. मात्र, विरोधकांनी या सर्वच वटहुकुमांना विरोध केल्यामुळे या अधिवेशनातही सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच खडाजंगी रंगण्याची चिन्हे आहेत.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होईल व ८ मे रोजी त्याचे सूप वाजेल. या अधिवेशनात अर्थमंत्री अरुण जेटली २८ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. तत्पूर्वी, २६ फेब्रुवारी रोजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू रेल्वे अर्थसंकल्प सादर करतील. तद्नंतर २७ तारखेला आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचे २0 मार्च रोजी सूप वाजेल. महिनाभराच्या विश्रांतीनंतर २0 एप्रिल रोजी दुसरा टप्पा सुरू होईल व ८ मे रोजी अधिवेशनाचे सूप वाजेल. सुट्टीच्या कालावधीत संसदीय समिती विविध मंत्रालयांकडून सुचवण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय प्रस्तावांची समीक्षा करेल. २३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. त्यानंतर २४ व २५ तारखेला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होऊन धन्यवाद प्रस्ताव पारित करण्यात येईल. या २ दिवसांत धन्यवाद प्रस्ताव पारित झाला नाही तर तो पुढे ढकलण्यात येईल. यापूर्वीचे दोन्ही अर्थसंकल्प शनिवारीच सादर करण्यात आले होते, अशी माहिती एका वरिष्ठ मंत्र्याने दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय प्रकरणांच्या समितीच्या बुधवारी येथे झालेल्या बैठकीनंतर अधिवेशनाच्या वेळापत्रकाची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनानंतर मोदी सरकारने ८ वटहुकूम काढले आहेत. यावरून विरोधकांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. त्यामुळे या वटहुकुमांचे कायद्यात रूपांतर करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. मात्र, सरकार या अधिवेशनात जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने काढलेल्या वटहुकुमांची आकडेवारी सादर करणार असल्याचे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडूंनी सांगितले आहे. त्यामुळे सरकारनेही विरोधकांच्या विरोधातील हवा काढण्याची संपूर्ण तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे.