राज्यात सर्व शहरांमध्ये सीसीटीव्ही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात सर्व शहरांमध्ये सीसीटीव्ही

Share This
मुंबई : वाहतुकीचे सिग्नल सर्रास तोडून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडवणार्‍या वाहनचालकांना चाप लावणारी व्यवस्था (सीसीटीव्ही) राज्यातील प्रमुख शहरांमध्ये लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी नुकतीच दिली. नवी मुंबईतील सीसीटीव्ही व्यवस्थेच्या यशस्वितेनंतर सरकारने ही तयारी दाखवली आहे.

सिग्नल वा वाहतूक पोलिसांना न जुमानता वाहने हाकणार्‍या वाहनचालकांचा टक्का वाढताच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अनेक अपघातही घडतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाकडून नवी मुंबईत अनेक महत्त्वाच्या सिग्नलवर मे २0१४मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही बसवण्यात आले. या कॅमेर्‍यांमुळे सिग्नल तोडणारे त्यात कैद झाले आणि चालकांना त्यांच्या घरी नोटिसा पाठवून दंड वसूल करण्यात आला. तो प्रयोग यशस्वी होत असल्याने सरकारने आता राज्यातील प्रत्येक शहरांतील प्रमुख चौकात अशी यंत्रणा बसवण्याची तयारी चालवली आहे. राज्यातील वाहतूक पोलिसांना जूनपासून अँण्ड्रॉईड उपकरण व दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी क्रेडिट वा डेबिट कार्ड वापरण्याचे मशीन देण्यात आले आहे. त्यामुळे नियम तोडणार्‍या चालकांना दंडासाठी छापलेले चलन थेट दिले जाईल व चालकांकडून लागलीच दंड वसूल केला जाईल, असेही अग्रवाल म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages